बॉलीवुड अभिनेता विवेक ओबेरॉयने अभिनेत्री जूही चावला ही लहानपणी आवडती अभिनेत्री होती असे सांगून टाकले आहे. टीवीवरील रिएलिटी शो ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ च्या सेटवर विवेक म्हणाला लहानपनापासूनच मी अभिनेत्री जूहीचा दिवाना आहे. तिचे सर्व सिनेमे मी पहिले आहेत. जी टीवी वरील एका कार्यक्रमाप्रसंगी विवेकने जूहीला बघितल्यानंतर कबुली दिली.
या कार्यक्रमावेळी अभिनेत्री जूहीने सादर केलेले ‘गजब का है दिन’ या गाण्यावरिल डान्स पहिल्यानंतर विवेक म्हणाला, ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा पाहिल्यानंतर मी ख-या अर्थाने जुहीचा दीवाना झालो.’ जूहीने त्याला हसत हसतच प्रश्न केला की, ‘ दहा वर्षाचा असतानाच दिवाना झाला होता का ?’ याचे उत्तर विवेकने ‘हा’ असे दिले.
विवेक सध्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ मध्ये जजची भूमिका करीत आहे. या शो मध्ये जूही आगमी काळात येत असलेल्या ‘हम हैं राही कार के’ या सिनेमाच्या प्रचारासाठी ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या शो मध्ये सहभागी झाली होती. या वेळी तिच्या सोबत अन्य कलाकार देव गोयल आणि अदा शर्मा हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या एपिसोडचे प्रसारण रविवारी करण्यात येणार आहे.