आणि मेट्रो धावली

मुंबई दि.१ – महाराष्ट्र दिनी मुंबईत आज महाराष्ट्रातील पहिल्या मेट्रोने मुख्यमंत्री, वरीष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या समवेत आपला पहिला वहिला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.  मेट्रोची ही पहिली चाचणी अत्यंत यशस्वी ठरली असून मेट्रोने आज वर्सोवा कार डेपो ते आझादनगर हा पहिला प्रवासाचा टप्पा पूर्ण केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिला हिरवा कंदिल दाखविला.

मुंबईच्या अभिमानाने स्थान असलेल्या मेट्रोचा उर्वरित मार्ग टप्प्याटप्प्याने खुला केला जाणार आहे. पहिला सात किलोमीटरचा मार्ग ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये खुला होत असून त्यानंतरचा उर्वरित मार्ग डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ पर्यंत खुला केला जाणार आहे. सुमारे साडेअकरा किलोमीटरच्या या मार्गावर एकूण १२ स्टेशन्स आहेत.

रिलायन्स इन्फ्रा आणि मुंबई मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचा हा संयुक्त प्रकल्प आहे. पहिली यशस्वी धाव घेऊन मेट्रो आता मार्गस्थ झाली अशी प्रतिक्रिया मेट्रो अधिकारी मंडळाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment