बालाजी टेलिफिल्मस वर आयकर विभागाचे छापे

मुंबई दि. ३०- सर्व देशभर प्रसिद्ध असलेल्या बालाजी टेलिफिल्म्स या  फिल्म टेलिव्हिजन प्रॉडक्शन हाऊसवर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास आयकर विभागाने छापे टाकले. कर चुकवेगिरी संदर्भात हे छापे टाकण्यात आले. बालाजीच्या कार्यालयाबरोबरच एकता कपूर, जितेंद्र, तुषार कपूर आणि कंपनीच्या अन्य संचालकांच्या घरांवरही अधिकार्‍यांनी छापे टाकले असल्याचे समजते.

या कंपनीवर आयकर विभागाचे छापे पडल्याचे वृत्त हा हा म्हणता मुंबईभर पसरले आणि सर्वत्र या छाप्यांबाबतच चर्चा सुरू झाली. छाप्यात नक्की काय सापडले किवा किती कर चुकवेगिरी केली गेली आहे यासंबंधी माहिती मिळू शकली नाही.

क या अक्षराने सुरू होणार्‍या मालिका आणि चित्रपट हे बालाजी टेलिफिल्मचे वैशिष्ठ समजले जाते. एकता कपूर ही या कंपनीची सर्वेसर्वा असून तिच्या मालिका आणि चित्रपटांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व पसंती मिळली आहे.

Leave a Comment