हसीच्या कामगिरीवर सर्वचजन खुश

चेन्नई- आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. सुरुवातीला अडकळत सुरुवात करणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ पुन्हा गुण तकत्यात अव्वलस्थानी आला आहे. या विजयात शानदार योगदान देणारा अनुभवी खेळाडू मायकेल हसीच्या कामगिरीवर सर्वचजन सध्या जाम खुश आहेत.

हसीच्या कामगिरीचे संघाचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे. स्टीफन फ्लेमिंग म्हणाला, ‘ गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता हसी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. केकेआरविरुद्ध सुद्धा त्याने जबरदस्त खेळी केली. त्याच्या प्रदर्शनात सातत्य आहे. त्याने केलेली खेळी कौतुकास्पद आहे. त्याच्या प्रदर्शनामुळे इतराना प्रेरणा मिळत आहे. ‘

चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयात हसीचे योगदान आहे ते विसरून चालणार नाही. त्याच्यावर आमच्या फलंदाजीची मदार अवलंबून आहे. त्यामुळ आगामी काळात त्याच्या खेळीवर बरेच काही अवलंबून असल्याचे फ्लेमिंगने यावेळी बोलताना स्पष्ट केले.