कोल्हापुर- काही दिवसापासून शांत झालेले कोल्हापुरातले टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटले आहे. सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत दोन टोलनाक्यांना लक्ष्य केले. यावेळी दोन टोलनाक्यांवर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या आंदोलनामध्ये टोलनाक्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
मनसेचे टोलविरोधी आंदोलन: दोन ठिकाणी जाळपोळ
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत उसगावचा टोलनाक्यावर तोडफोड तर फुलेवाडीचा टोलनाका पेटवला. कोल्हापुरातल्या टोलवसूलीला विरोध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड आणि जाळपोळ केली असल्याचे समजते. गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरातल्या टोलनाक्य़ांविरोधात जनतेमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही अनेकदा टोलनाक्य़ांविरोधात अनेक आंदोलने झाली. ११ फेब्रुवारीला शिवसैनिकांनी टोलनाक्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर सोमावारी रात्री पुन्हा मनसैनिकांनी टोल नाक्यांची तोडफोड केली आहे. कोल्हापुरातल्या जनतेचा टोलनाक्यांविरोधातला संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळ आगामी काळात हे आंदोलन पुन्हा पेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
