मंगळावर वस्ती करण्यासाठी २० हजार जणांनी भरले अर्ज

mars

मार्स वन या नावाने एका डच एरोस्पेस कंपनीने आखलेल्या प्रकल्पात मंगळावर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार्याा स्पेस जर्नीसाठी आत्तापर्यंत जगभरातील  २० हजार नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यातील ६०० जण चिनी आहेत. या स्पेस जर्नीत प्रवाशाना मंगळावर सोडले जाणार आहे आणि नंतर तेथेच हे प्रवासी वस्ती करून राहू शकणार आहेत.२०२३ सालापासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

ही डच कंपनी अवकाशातील राहण्यासाठीची अन्य योग्य स्थळे शोधण्याचा दावा करते. मात्र मंगळावर अजून मानवी वस्ती नाही आणि तेथील हवामानाबाबतही पुरेशी माहिती नसताना नागरिकांकडून असे पैसे गोळा करणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासांरखे असल्याची चौफेर टीका या कंपनीवर केली जात आहे.

या कंपनीच्या दाव्यानुसार २०२३ मध्ये पहिली चार माणसे मंगळावर पाठविली जाणार असून तो पर्यंत जेवढे अर्ज येतील त्यातील चार जणांची निवड पहिल्या टप्प्यात टिव्ही शोच्या माध्यमातून मतदान घेऊन केली जाणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन बुकींगची सुविधा कंपनीने दिली आहे शिवाय ही कंपनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविली जात असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक बाम लँडटॉर्प यांनी सांगितले. ते म्हणाले की आमची योजना जाहीर होताच पहिल्या तीन दिवसांत आमच्याकडे २० हजार अर्ज आले असून त्यातील ६०० चिनी नागरिक आहेत. 

आमची कंपनी मंगळावरील वास्तव्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल असा विश्वासही बाम यांनी व्यक्त केला आहे आणि किमान पाच लाख अर्ज कंपनीकडे येतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. २०२३ पर्यंत मंगळावर जाणारे प्रवासी भाजीपाल्यावर तेथे जगू शकतील असाही त्यांचा दावा आहे.

Leave a Comment