आगामी काळात रेखाच्या सुपरहिट ‘खूबसूरत’ या सिनेमाचा रिमेक लवकरच येत असून त्यामधून अभिनेत्री सोनम कपूर झळकणार असल्याचे समजते. या सिनेमासाठी बॉलीवुडची अभिनेत्री सोनमला साइन केले आहे. सोनमचा ‘खूबसूरत’ या सिनेमाची शूटिंग ऑगस्टमध्ये सुरु होणार असल्याचे समजते.
याबाबत बोलताना अभिनेत्री सोनम म्हणाली, ‘या सिनेमाची कथा मूळ सिनेमापेक्षा खूपच वेगळी आहे. फक्त या सिनेमातील मुख्य भूमिका तशाच पुढे ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा सर्वाना आवडेल असा आहे. यासाठी मी सध्या खुप मेहनत घेत असून माझ्या चाहत्यांना आवडेल असे काम मी करीत आहे. हा थोडासा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असून या सिनेमाचे कथानक विशेषता आजच्या मुलींना आवडेल असेच आहे. ‘
१९८० साली दिग्दशक ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘खूबसूरत’ हा सर्वश्रेष्ठ सिनेमाला फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. हा सिनेमा एक मौज-मस्ती करणा-या मुलीचा आहे. तिचे एका डॉक्टरवर प्रेम बसते. लग्नानंतर सासरी सर्वांचे मने जिंकतेण्यात ती यशस्वी होते. असे एकंदरीत या सिनेमाचे कथानक आहे.