नवी दिल्ली दि.३० – सॅमसंग इंडियाने त्यांच्या नॉईडा येथील प्रकल्पात लवकरच हाय एंड स्मार्टफोन गॅलॅक्सी फोरचे उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मोबाईल डिजिटल इमेजिंग कंट्री प्रमुख विनित तनेजा यांनी ही माहिती दिली. अर्थात हे उत्पादन नक्की कधीपासून सुरू होणार याबाबत मात्र त्यांनी कांहीही स्पष्ट केले नाही.
तनेजा म्हणाले की नॉईडा येथील कंपनीच्या प्रकल्पात दरवर्षाला ३५ ते ४० दशलक्ष फोन बनविले जात असून त्यात गॅलॅक्सी एस थ्रीसह १२ स्मार्टफोनचा समावेश आहे. गॅलॅकसी फोर मात्र सध्या दक्षिण कोरियातून आयात केला जात आहे. भारतात या फोनलाही फारच चांगली मागणी आहे. भारतीय बाजारपेठेचा सध्याचा कल पाहून कंपनीने २० हजार रूपयांच्या पुढच्या फोनचा मार्केट साईज डबल करण्याचे ठरविले आहे. भारतात सध्या सॅमसंग हीच लिडिंग कंपनी असून भविष्यात त्यांना अॅपल, ब्लॅकबेरी आणि नोकिया यांच्याशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे असेही ते म्हणाले.