पुणे दि २ ९ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रथमच नाशिकजवळ ओझर येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त नागरी विमानतळ उभारला जात असून त्यामुळे मुंबई-पुणे-नाशिक या औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या शहरांच्या विकासाला मोठा हातभार मिळणार आहे. प्रकल्प सुरु झाल्यानंतर तीन वर्षात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक लाख रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
ओझर येथे अत्याधुनिक नागरी विमानतळ
हिंदुस्तान एरोनोटिकस लिमिटेडच्या (एच ए एल ) सहकार्याने उभारला जाणारा हा देशातील पहिला विमानतळ प्रकल्प आहे.
एकावेळी ३ ० ० प्रवासी हाताळण्याची क्षमता या विमानतळाची असल्याने त्याच्याशी निगडीत आतिथ्य , वाहतूक, पर्यटन , सेवा उद्योगाचा मोठा विस्तार अपेक्षित असून त्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने नाशिक शहर आणि परीसराच्या विकासाला हातभार लागणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आकाराला येतो आहे. चालू आर्थिक वर्षातच या विमानतळाचे काम पूर्ण होउन तो एच ए एल कडे हस्तांतरित केला जाणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले
कॅनडातील ग्रीन फ्रेंडली म्हणून ओळख असलेल्या स्टानटेक कंपनीतर्फे विमानतळाच्या इमारतीचे रचना आरेखन करण्यात आले आहे . उत्तर महाराष्ट्रातील अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांना या विमानतळामुळे दक्षिण आणि पूर्व भागात पोहोचणे सोपे जाणार आहे या खेरीज घरबांधणी, माहिती तंत्रज्ञान, रिटेल, वाहन हॉटेल आरोग्यसेवा या इतर क्षेत्रानाही त्याचा फायदा मिळणार आहे. राज्याच्या इतर भागात अशा प्रकारे खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या सहकार्याने विमानतळ उभारणीचे कंत्राटी काम सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्यास महसूल वाढ आणि रोजगार निर्मिती हे दोन्ही हेतू साध्य होणार आहेत