महाराष्ट्र बँकेचे दोन लाख तीस हजार कोटी रुपये वार्षिक उद्दिष्ट

पुणे दि २ ९ : महाराष्ट्र बँकेने चालू आर्थिक वर्षात दोन लाख तीस हजार कोटी रुपये व्यवसाय उद्दिष्ट ओलांडण्याचे ठरविले असून आणखी १ १ २ ५ ए टी एम सुरु केली जाणार आहेत अशी माहिती अध्यक्ष नरेंद्र सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेनंतर अध्यक्ष म्हणाले की सध्याच्या शाखांची संख्या दोन हजारावर नेली जाणार असून राज्यातील महत्वाच्या शहरात लघु आणि मध्यम उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष शाखा सुरु केल्या जाणार आहेत . कर्ज मंजुरीचा वार्षिक आराखडा एक लाख कोटी रुपयांचा असून त्यापैकी ५ ० हजार कोटी रुपये कृषी क्षेत्रासाठी असतील. सरकारच्या लाभार्थींना थेट सवलती देण्याच्या योजनेसाठी प्रशासकीय तयारी करण्यात आली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची वेगाने दखल घेत यावी यासाठी ऑनला ईन यंत्रणा अमलात आणली जाणार आहे. बँकेचा निव्वळ नफा ७ ६ टक्क्यांनी वाढून ४ ३ ० . ८ ३ कोटी रुपयांवरून ७ ५ ९ . ५ २ कोटी रुपये झाला आहे

मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन कर्मचारी आणि अधिकारी मिळून आणखी दोन हजार जणांची भारती केली जाईल असेही त्यांनी सांगितले बँकेने ३ १ मार्च ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रती शेअर अडीच रुपये लाभांश जाहीर केला आहे . बँकेच्या आज पुण्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला . संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर लाभांश दिला जाणार आहे

Leave a Comment