
– काहीतरी उचापती करून सतत चर्चेत राहण्याचे कौशल्य चांगल्यापैकी अवगत
असलेली टीआरपी क्विन राखी सावंत आता निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेणार
आहे. राखीलाही आमदार-खासदार होण्याचे वेध लागले की काय, अशी तुमची समजूत
झाली असेल तर तसे अजिबात नाही. कारण ही निवडणूक विधानसभा, लोकसभा वा
कुठल्या महापालिकेची नाही तर सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनच्या
निवडणुकीत ती आपले नशीब आजमावून पाहणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने
सध्या ती जोरदार तयारीला लागली आहे. कलाकारांना योग्य तो सन्मान मिळवून
देण्यासाठी तसेच सध्या सिस्टीममध्ये बदल करण्याच्या उद्देशाने ती ही
निवडणूक लढविणार आहे. आपल्या आगामी योजनांबाबत अधिक खुलासा करताना राखी
सांगते की, लोकांचे मनोरंजन करणार्या कलाकारांना जेवढा मानसन्मान
मिळायला पाहिजे, तेवढा तो त्यांना दिला जात नाही. अनेकदा काम करूनही
त्यांना आपल्या मेहनतीचे पैसे मिळत नाहीत. यामुळे अनेक कलाकारांवर
आत्महत्या करण्याचीसुद्धा वेळ ओढावलेली आहे. ही अतिशय खेदाची बाब अहे. या
सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व कलाकारांना त्यांचे हक्क
मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कलाकारांचे जीवन
सुकर होईल असा माझा विश्वास आहे. आपली ही लढाई फक्त कलाकारांसाठी आहे.
या निवडणुकीत यश आले तर आपण नक्कीच सगळी सिस्टीमच हलवून सोडू. या गोष्टी
बदलण्याचा मी प्रामाणिक प्रय▪करेल. दुर्दैवाने त्यात यश आले नाही तर
ताबडतोब राजीनाम फेकून देईल, असेही राखीने आपल्या नेहमीच्या ठसक्यात
सांगितले. आपल्या या नियोजित सुधारणांना ‘राखी का एजेंडा’ असे नाव तिने
दिले आहे. कलाकार संघटनेची ही निवडणूक दर दोन वर्षांनी होते.
