आशिकी- 2 भावनीक प्रेमकथा

जुन्या चित्रपटांचा रिमेक आणी सिक्वेल या बाबी आता नविन राहिल्या नाहीत.
त्यात भर पडली आहे आशिकी-2 ची. नव्वदच्या दशकाता आलेला आशिकी आणि
त्याची गाणी आजही लोकप्रिय आहेत. आशिकी -2 चा आशिकीशी काही संबध नाही.
सत्तरच्या दशकात अमिताभ – जया बच्चनचा अभिमान आला होता त्यावर आधरीत आणि
एक दिड वर्षापुर्वी आलेल्या रॉकस्टरशी या चित्रपटाचे साम्य असल्याचे
दिसते.

आशिकी- 2 ही राहुल जयकर उर्फ आरजे (आदित्य रॉय कपूर) नावाच्या
रॉकस्टारच्या आयुष्याची कथा आहे. अगदी कमी वयात यशाचे उतुंग शिखर
गाठणारा राहुल दारूच्या नशेने ग्रासलेला रॉकस्टार आहे. गोव्याच्या एका
छोट्याश्या बारमध्ये राहुल आणि आरोही केशव अत्रे (श्रद्धा कपूर)ची भेट
होते. सामान्य घरात वाढलेली आरोही अतिशय साधी आहे. राहुल तीचे गाणे ऐकुण
भारावुन जातो आणि तिला गाण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून
देण्याचा निर्णय घेतो. स्वःतचे करिअर दारूच्या नशेपायी संपत आलेली असले
तरी त्याला आरोहीला मोठी गायीका बनवयाचे आहे आणि त्यासाठी तो जिव ओतुन
प्रयत्न करतो. एका रात्रीच ती एक मोठी स्टार होते. हे सगळ घडत असताना
त्या दोघांमध्ये जवळीक वाढते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण
परिस्थिती त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही.

स्टार कितीही मोठा असला तरी परिस्थितीमुळे त्याला पडयाआड जावे लागते
किंवा परिस्थिती त्याला पडद्याआड पाठवते अशा मेसेज दिग्दर्शकाने यातुन
देण्याचा प्रयत्न केला आहे. दारुच्या आहारी गेल्यामुळे फक्त कौटुंबिक
जीवनच उद्धवस्त होत नाही, तर आत्मविश्वासही डगमळतो हे वास्तव
दिग्दर्शकाने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडले आहे. मात्र कथेचे
रूपांतर पटकथेत करताना काही गोष्टीची सुसंगत कारणमिमांसा करण्याची
आवश्यकता होती. दिग्दर्शक मोहित सुरीने चित्रपटातील प्रेमकथा आणि संगीतात
भावनिक सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. पटकथा लिहिताना राहुल जयकर
हे पात्र समजण्यात थोडीशी गडबड केलेली आहे. राहुलच्या अपयशामागील नेमके
कारण समोर येत नाही.राहुल लोकांचे टोमणे ऐकून आरोहीपासून दूर जाण्याचा
निर्णय घेतो, ही बाब पचायला थोडी जड जाते.

आदित्य राय कपूरने राहुल जयकरच्या पात्रातील प्रत्येक बारकाव्याला आपल्या
प्रभावशाली अभिनयाने योग्य न्याय दिलेला आहे. खासकरून भावनिक प्रसंगांत
त्याची पकड मजबूत दिसून आली. श्रद्धा कपूरनेही आपल्या अभिनय आणि मेहनतीने
प्रेक्षकांना अवाक् केले आहे. आरोहीच्या पात्राला मजबूत करण्यात
श्रद्धाची सहजता, निरागसता या व्यतिरिक्त तिचे संवादफेकीचे कौशल्यही
महत्त्वाचे ठरते. कॅमेर्यासमोर वावरताना तिचा आत्मविश्‍वास दिसून येतो.
मुख्य जोडी वगळता चित्रपटाचे संगीत हे चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे
मात्र चित्रपटात सातत्याने फक्त टायटल साँगची बॅकग्राऊंड ऐकायाअ मिळते.
म्युझीकल लव्हस्टोरी अशी चित्रपटाची जाहिरात करण्यात आलेली असली तरी चार
संगीतकार असूनही संगीतची उणिव भासते. प्रेक्षकाच्या भावनेला हात
घालण्याचा मोहितने चांगला प्रयत्न केला आहे.

चित्रपट – आशिकी 2
निर्मिती – भूषण कुमार, मुकेश भट्ट, कृष्णन कुमार
दिग्दर्शक – मोहित सूरी
कलाकार – आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर

Leave a Comment