शाहरुख भरणार मन्नतसाठी आठ कोटी कर

मुंबई येथील बांद्रा मधील बैंड स्टैंड सारख्या प्राइम लोकेशनमध्ये किंग खान शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला आहे. मात्र या शानदार कोट्यवधी रुपयाच्या जमीनीसाठी किंग खान वर्षाला फक्त २,३२५ रुपये भाडे सरकारला देतो. सरकारने किंग खानसाठी लीजवर अलॉट केलेली जमीन ही २४४६ स्क्वर मीटर इतकी आहे. मात्र किंग खान सरकारला कर म्हणून भरत असलेली ही रक्कम खूपच कमी आहे. या रकमेच्या तुलनेत फ्लैट, घर-बंगल्याचे भाडे किती तरी पटीने जास्त आहे.

त्यामुळेच सरकारने लीजचे भाडे चेंज करण्याचे ठरविले आहे. या ठिकाणच्या लीजला आता प्राइम लोकेशनचे प्रॉपर्टीचे भाडे कर म्हणून लावण्याचे ठरविले आहे.यापूर्वी सरकारकडून ९९ वर्षासाठी प्रॉपर्टी लीजवर दिली जात होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. सरकारने आता त्याची मुदत ३० वर्ष इतकी केली आहे.

नवीन रेटनुसार, आता किंग खानला या प्लॉटचे भाडे म्हणून वर्षाला १९ लाख रुपये भरावे लागणार आहेत. लीज ३० वर्षसाठी असल्याने त्याला आता ८.३ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतरच शाहरुखला या बंगल्याची आउटराइट ओनरशिप मिळणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात शाहरुख हा कर भरणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment