रणबीर-माधुरी लावणार ठुमके

बॉलीवुडची धक्क-धक्क गर्ल माधुरी दीक्षितचे प्रशंसक खुप आहेत. या लिस्टमध्ये रणबीर कपूरचे नाव देखील समाविष्ट आहे. मात्र ब-याच दिवसानंतर रणबीरचे माधुरी सोबत डान्स करण्याचे स्वपन पूर्ण झाले आहे. आगामी काळात रणबीर व माधुरी एकत्रित ठुमके लावताना पहावयास मिळणार आहेत.

यापूर्वी रणबीर कपूरने कित्येकवेळा माधुरी दीक्षित सोबत ताल मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या हा योग जुळून येत नव्हता. रणबीर आणि माधुरी आगामी काळात येत असलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ मध्ये आयटम सॉंगवर डान्स करताना दिसणार आहेत.

सध्या माधुरी दीक्षित ‘गुलाब गैंग’ या सिनेमाचे शूटिंग करीत आहे. तिने तिच्या बिजी शैड्यूलमधून वेळ काढून हे आयटम सॉंग शूट करण्यास सुरुवात केली आहे. माधुरी दीक्षितने यापूर्वी ब-याच सिनेमात डान्स आणि एक्‍टिंग केली आहे. मात्र ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातून ती पहिल्यांदा आयटम सॉंग करत आहे.

‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील आयटम सॉंग फराह खान कोरियोग्राफ करीत आहे. फराह माधुरी सोबत २००२ साली ‘हम तुम्‍हारे हैं सनम’ या सिनेमानंतर आताच काम करीत आहे. या सिनेमात रणबीर शिवाय दीपिका पादुकोण, कल्‍कि कोचलिन आणि आदित्‍य रॉय-कपूर यांची मुख्य भूमिका आहे.

Leave a Comment