कायदा पाळला पाहिजे

उत्तर प्रदेशाचे मंत्री आझ्रमखान यांची अमेरिकेच्या विमानतळावर तपासणी करण्यात आली याचा भारी राग आला आणि त्यांनी मोठाच तमाशा केला. या प्रकाराच्या उलट सुलट प्रतिकि‘या भारतात उमटल्या आहेत. भारतातल्या हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक महोत्सवाचे व्यवस्थापन कौशल्याने केले. या महोत्सवाला 10 कोटी लोकांनी भेट दिली. एक चंेंगराचेंगरीची दुर्घटना वगळता या कार्यक‘मात एकही गैरप्रकार घडला नाही. 10 कोटी भाविक ही काही लहान सं‘या नाही. अमेरिकेच्या लोकसं‘येच्या 40 टक्के आहे ती. एवढ्या सं‘येचे व्यवस्थापन करणारा मंत्री कोण आहे हे आपण पाहिले पाहिजे आणि त्याने केलेल्या व्यवस्थेचे इंगित समजून घेतले पाहिजे असे अमेरिकेतल्या काही व्यवस्थापन शिक्षण देणार्‍या संस्थांना वाटले आणि त्यांनी आझमखान यांना आपल्या व्यवस्थापनावर भाषण द्यायला म्हणून अमेरिकेत पाचारण केले. आझमखान तिथे गेले आणि बोस्टनच्या विमानतळावर त्यांची झडती घेण्यात आली. ती झडती अनावश्यक आहे असे त्यांना वाटले. ती झडती घेणार्‍या महिला अधिकार्‍यांवर ते चिडले आणि आपण मंत्री असल्याने आपली अशी झडती घेण्याचे काही कारण नाही अशी हुज्जत घालायला लागले. मात्र ती काही भारतीय अधिकारी नव्हती. ती अमेरिकी अधिकारी होती. तिने आझमखान यांना नम‘पणे उत्तर दिले. आपण, आपले कर्तव्य करीत आहोत तेव्हा आझमखान यांनी आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती तिने केली.

आझमखान यांनी तिचे न ऐकता तिथे गोंधळ घातला आणि आपण केवळ मुस्लिम आहोत म्हणून आपल्याला अशी वागणूक दिली जात आहे अशी तक‘ार केली. ते एवढे चिडले की, त्यांनी आपले सारे कार्यक‘म रद्द करून आणि केवळ एक भाषण करून परत जाणार आहोत अशी घोषणा केली. ही बातमी भारतात पोचताच तिच्यावर अनेक प्रतिकि‘या उमटल्या. काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी यात नवे काही नाही, आझमखान यांनी त्या तपासणीला सहकार्य करायला हवे होते असे मत मांडले. या दोन्ही विचारांच्या प्रकाशात आपल्याला या घटनेबाबत आपली प्रतिकि‘या व्यक्त करावी लागणार आहे. कारण असा हा काही नवा प्रकार नाही. यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, शाहरुखखान आणि केन्द्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता म्हणजे केवळ या तिघांचीच तपासणी झाली होती असे नाही. केवळ अमेरिकेतच नाही तर अनेक देशात परदेशातून जो कोणी येतो त्याची विमानतळावर कसून तपासणी केली जाते. जगातल्या दहशतवादी वातावरणात ते आवश्यक झाले आहे.

या तिघांचे प्रकरण गाजले होते म्हणजे त्यांची तपासणी झाली याबद्दल भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. डॉ. अब्दुल कलाम हे कोण आहेत हे अमेरिकेला कळत नाही का ? ही काही सामान्य माणसे आहेत का ? मग त्यांची अशी झडती घ्यायला नको असे भारतीयांचे म्हणणे. अमेरिकेत काय या तिघांचीच तपासणी झाली होती असे नाही. जो कोणी भारतीय किंवा परदेशी माणूस अमेरिकेत जातो त्याची तपासणी होतच असते. तो नेहमीचाच भाग आहे. डॉ. कलाम यांनी काही नाराजी व्यक्त केली नव्हती. त्यांनी तर यात अपमानास्पद काही नाही, तो नेहमीच्या तपासणीचा भाग आहे असे म्हटले होते. आनंद शर्मा तर मंत्री असूनही त्यांना झडतीला सामोरे जावे लागले. अमेरिकेत त्या देशातल्या मंत्र्यांनाही अशा तपासणीला सामोरे जावे लागते. मग भारतीय मंत्र्यांना त्यातून कशी सूट मिळेल. तिथला जो काही नियम असेल तो आपण सर्वांनी पाळला पाहिजे आणि कोणाला त्या नियमाला सामोरे जावे लागले असेल तर त्याबद्दल नाराजी वगैरे काही व्यक्त करायला नको आहे. या तपासणीचा कोणालाही अपमान वाटण्याचे काही कारण नाही. पण अपमान वाटतो कारण भारतात आपल्याला तशी सवय झालेली असते. आपल्या देशात कायदे खूप असतात पण काही लोकांना कायदे लागू केले जात नाहीत. मोेठ्या लोकांना कायद्यात बसवणे हे आपण त्यांच्यासाठी अपमानास्पद समजत असतो. त्यामागे आपली जी मनोवृत्ती आहे तीच नेमकी आता आझम खान यांच्या रूपाने व्यक्त झाली आहे.

काय म्हणणे होते त्यांचे ? त्यांनी एवढा मोठा कुंभमेळा यशस्वी केला असा त्यांचा दावा आहे. तो यशस्वी कसा झाला ? काही ठिकाणी रांगा लावल्या असतील. काही ठिकाणी क‘माक‘माने माणसे सोडली असतील. काही ठिकाणी कोणालाच प्रवेश नाही असे बंधनही घातले असेल. अशा निर्बंधांची अंमलबजावणी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केली असेल म्हणूनच त्यांना हे आयोजन शिस्तीत करता आले. काही विशिष्ट लोकांना, जाती वरून, पदावरून, हे निर्बंध लागू केले जाणार नाहीत अशी सूट त्यांनी दिली असती तर हा कुंभमेळा यशस्वी होणे शक्यच नव्हते. पण त्यांनी कुंभमेळ्यात, शिस्तीचे नियम सर्वांना लागू, नियमापुढे सर्व समान असे जे नियम केले होते. त्याच नियमाने अमेरिकेत त्यांची तपासणी होत होती. ती करणे हा आपला अपमान आहे असे मानणे आणि तो आपण मुस्लिम आहोत म्हणून केला जात आहे अशी आदळ आपट करणे हे न्यूनगंडाचे लक्षण आहे. आझमखान यांनी यापूर्वी झालेल्या अशा प्रकाराच्या बातम्या वाचल्याच असतील. त्यांनी त्यावर झालेली चर्चाही ऐकली असेल पण त्यापासून ते काहीच शिकले नाहीत असे म्हणावे लागेल.

Leave a Comment