कर्नाटकात पुन्हा काँग्रेस ?

नवी दिल्ली, दि.२६ -कर्नाटकात ५ मे यादिवशी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच त्या राज्यात काँग्रेस सत्ता काबीज करेल, असा निष्कर्ष एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. सीएनएन-आयबीएन आणि द विकच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसला ११७ ते १२९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील निवडणुकीत या पक्षाला ७१ जागा मिळाल्या होत्या.

कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजपला सरकारविरोधी लाटेचा मोठा फटका बसणार आहे. मागील वेळी १०४ जागा जिंकणार्याी भाजपला यावेळी केवळ ३९ ते ४९ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) ३४ ते ४४ जागा मिळतील. तर, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक जनता पक्ष आणि अपक्षांना मिळून १४ ते २२ जागा मिळतील, असे भाकितही करण्यात आले आहे.

Leave a Comment