ओबामांना मिळालेल्या गिफटस

वॉशिग्टन दि. २६ – गोल्फ प्रेमी आणि फूटबॉलची विशेष आवड असणारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणजे बराक ओबामा यांना परदेशी सरकारे अथवा परदेशी प्रतिनिधींकडून २०११ मध्ये मिळालेल्या गिफटची यादी यूएस स्टेट विभागाने आज जाहीर केली आहे. या गिफ्ट म्हणजे जणू अलिबाबाची गुहाच उघडावी इतक्या अनेक प्रकारच्या असल्या तरी त्यातील कांही खास गिफट खालीलप्रमाणे आहेत.

तंदुरूस्ती बाबत विशेष जागरूक असलेल्या या अध्यक्षांना त्यांचे गोल्फ प्रेम लक्षात घेऊन फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांनी हर्मेस गोल्फ बॅग भेट दिली असून तिची किंमत आहे ७७५० डॉलर्स. या बॅगेसोबत अन्यही काही गिफ्ट ओबामा यांना देण्यात आल्या असून या त्यांची एकूण किमत आहे ४१६७५.७१ डॉलर्स. या भेट वस्तू २०११ या एका वर्षात दिल्या गेल्या आहेत. जर्मन चान्सेलर अंजेला मार्केल यांनी ओबामांना गोल्फ पूटर दिला आहे तर कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी टोरंटो रॅपटर्स टीमच्या सह्या असलेला बास्केट बॉल अमेरिकन अध्यक्षांना भेट म्हणून दिला आहे

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी विशेष तयार करून घेतलेली लाल पांढरी निळ्या रंगाची ऑस्ट्रेलियन रूल्स शर्ट ओबामांना भेटी दाखल दिली आहे तर चीनचे माजी अध्यक्ष ह्यू जिताओ यांच्यातर्फे एका कलाकाराने बनविलेला ४८ इंची ब्रॉन्झचा अब्राहम लिंकन यांचा पुतळा त्यांना दिला गेला आहे. या पुतळ्याची किंमत आहे ९८०० डॉलर्स.

अमेरिकेच्या नियमांप्रमाणे राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या भेट वस्तूंची यादी दरवर्षी जाहीर केली जाते आणि त्या वस्तू राष्ट्रीय संग्रहालयात ठेवल्या जातात.

Leave a Comment