
पुणे दि २ ६ : उच्च शिक्षणासाठी लागणारी भांडवलाची गरज लक्षात घेऊन अव्होन्स एजुकेशन लोन्स कंपनी १ २ . २ ५ टक्के दराने कर्ज देणार असून पुणे आणि पिंपरी चिंचवड सह राज्यातील नागपूर कोल्हापूर, सातारा, सांगली या शहरात व्यवसाय विस्तार करणार आहे.
पुणे दि २ ६ : उच्च शिक्षणासाठी लागणारी भांडवलाची गरज लक्षात घेऊन अव्होन्स एजुकेशन लोन्स कंपनी १ २ . २ ५ टक्के दराने कर्ज देणार असून पुणे आणि पिंपरी चिंचवड सह राज्यातील नागपूर कोल्हापूर, सातारा, सांगली या शहरात व्यवसाय विस्तार करणार आहे.
उच्च शिक्षण सध्या महाग झाले आहे . त्यामुळे अनेक पालकांना सह कर्जदार घेऊन विद्यार्थ्यांच्या नावावर कर्ज घ्यावे लागते . मात्र सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी बँकांचे व्याजदर अधिक असल्याने ते परवडत नाही म्हणूनच दिवाण हौसिंग फायनान्स या घर कर्ज क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने अव्होन्स एजुकेशन लोन्स ही सहयोगी बॅंकेतर वित्त कंपनी स्थापन केली. मुंबई, दिल्ली, बंगलोर , हैद्राबाद आणि चेन्नई या शहरात दोन महिन्यापूर्वी कंपनीचे कामकाज सुरु झाले आहे .
कंपनीच्या आगामी योजनांबाबत निवडक पत्रकाराना माहिती देताना व्यवसाय विभाग प्रमुख नीरज सक्सेना म्हणाले की किमान ५ ० हजार रुपये आणि कमाल रक्कम पाल्याची गरज आणि परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन आम्ही कर्ज मंजूर करतो केवळ पुण्याचा विचार केला तरी दर वर्षी २ ५ हजार मुले पुण्याबाहेर परदेशात शिकण्यासाठी जातात तर एक लाख मुले पुण्यात उच्च शिक्षण घेण्यास येतात . उच्च शिक्षणाची कर्जाची देशातील बाजारपेठ ८ ० हजार कोटी रुपयांची आहे; मात्र त्यापैकी १ ५ टक्के गरजेची पुर्तता होते. सरकारी बँकांना प्राधान्य क्षेत्राला कर्ज वाटपाचे बंधन असल्याने त्या गरज पूर्ण करू शकत नाहीत.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ लवकरच आमच्या कंपनीत २ ० टक्के भांडवली हिस्सा घेण्याची शक्यता आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की सध्या आम्ही दिवाण हौसिंगचे विक्री जाळे वापरणार आहोत. तसेच एखाद्याने दिवाण हौसिंग मध्ये मुदत ठेव ठेवल्यास त्या पावतीचा वापर तारण म्हणून करता येणार आहे. त्याखेरीज स्थावर मालमत्ता, विमा पॉलिसी तरण ठेवता येईल . कर्जाची परतफेड १ २ ० महिन्यात करायची आहे आमचे पोर्टलही यंदाच्या आर्थिक वर्षात सुरु होणार आहे