राजकारणात आजही अस्पृश्यता – नरेंद्र मोदी

तिरूवनंतपुरम दि.२५ – अध्यात्मिक गुरू, सुधारणावादी यांच्यामुळे समाजाला लागलेला अस्पृश्यतेचा शाप बर्‍याच प्रमाणात कमी झाला असला तरी राजकारणात मात्र अस्पृश्यतेचे प्रमाण वाढत चालले आहे असे प्रतिपादन  गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सिवगिरी येथील नारायण धर्म मिमांसा परिषदेत ते सिवगिरी मठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

मोदी यांनी यावेळी कोणत्याही पक्षाचे अथवा नेत्याचे नांव घेणे टाळले मात्र त्यांच्या या कार्यक्रमाविरोधात सीपीआय -एम ने केलेली निदर्शने आणि मठावर केलेले हल्ले तसेच कामगार मंत्री शिबू जॉन यांनी मोदींची भेट घेतली तेव्हा काँग्रेसच्या उंचावलेल्या भुवया यांना मोदी यांनी टार्गेट केले होते. मोदी म्हणाले की स्वातंत्र्यसंग्रामात आणि राष्ट्रीय चळवळीत अध्यात्मिक गुरूंचे योगदान मोठे आहे. त्यांनी समाजापुढे मांडलेला आदर्शवाद काटेखोरपणे अमलात आणला असता तर देशापुढच्या अनेक अडचणी सुटल्या असत्या.

आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचा आपल्याला अभिमान वाटतो असे सांगून मोदी म्हणाले की लहानपणापासूनच नारायण स्वामी, विवेकानंद यांच्या शिकवणीचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे. भारत हा युवा देश आहे.आज भारतातील ६५ टक्के जनता ३५ वयोगटातील आहे आणि ही देशाची मोठी संपत्ती आहे. त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे.

Leave a Comment