प्रीती झिंटाने पकडून दिले दोन आरोपी

मुंबई, दि.२४ – पादचारयाला धडक देऊन पळालेल्या रुग्णवाहिकेचा पाठलाग केलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मेहनतीला फळ मिळाले असून याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

२१ एप्रिल रोजी प्रीती विमानतळाच्या दिशेने जात असताना गणपत गौणाक(५७) या पादचारयाला रुग्णवाहिकेने उडवले होते. त्यात त्याच्या पायाला फॅक्चर झाले होते. ,मात्र तेथूनच जात असलेल्या प्रीतीने रुग्णवाहिकेचा पाठलाग करून या रुग्णवाहिकेचा क्रमांक पोलिसांना सांगितला होता. चौकशी दरम्यान ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी आता विलेपार्ले पोलिसांनी रुग्णवाहिकेचा चालक प्रशांत महाडिक व मालक परशुराम कांबळे याला अटक केली आहे.

Leave a Comment