आमदाराच्या मुलीने पळून जाऊन केले लग्न

हैदराबाद- आंध्र प्रदेशचे काँग्रेस आमदार ईली वेंकटा मधुदुधाना राव ऊर्फ ईली ननी यांच्या मुलीने घरातून पळून जाऊन आपल्या मित्रासोबत लग्न केले आहे. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाल्याने ईली अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलीने प्रेमविवाहाला विरोध करीत तिला ४ वर्षे घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला असून वडिलाकडून पतीच्या जीवितीस धोका असल्याची तक्रार तिने केली आहे.

आंध्र प्रदेशमधील आमदार ननी यांची मुलगी रमैया हिने तिचा इंजिनियर मित्र संदीप याच्यासोबत २००८ मध्ये गुपचूप लग्न केले होते. या विवाहाला ननी यांच्यासह घरच्या मंडळीचा विरोध होता. त्यामुळे ननी यांनी रमैयाला घरातून बाहेर पाऊल ठेवण्यास मनाई केली होती. अखेर तिने कोणी घरात नसल्याचे पाहून बुधवारी तिने पळ काढला आणि वकिलांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा संदीपशी कायदेशीर विवाह केला.

रमैयाने पोलिसांत तक्रार दिली आहे. वडिलांनी मला चार वर्षे घरात डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. त्यांच्याकडून माझ्या नव-याला धोका असल्याची तिने म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संदीप व रमैयाला सुरक्षा पुरवली आहे.

Leave a Comment