
नवी दिल्ली दि.२४ – लोकसभेच्या निवडणूका कदाचित याच वर्षात होतील अशी शक्यता गृहित धरून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम दिल्लीत सक्रीय झाली असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार प्रत्येक महत्त्वाच्या उमेदवारासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचे काम सुरू झाले असून खुद्ध नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे निश्चत केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अटलजींनी या मतदारसंघाचे १९९१ ते २००४ या काळात पाचवेळी प्रतिनिधित्व केले आहे. मोदी यांच्या या योजनेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिग यांचीही अनुमती असल्याचे समजते.
