सचिन कापणार ४० किलोंचा केक

कोलकाता – क्रिकेटच्या दुनियेतील मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुधवारी वयाची ४० वर्षे पूर्ण करीत आहे. त्याच्या वाढदिवसानिम्मित सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरतील अनेक क्रिकेटपटूनी त्याला वाढदिवसानिम्मित शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यासाठी कोलकात्यात आहे. तो ४० किलोंचा चॉकलेट केक कापून वाढदिवस साजरा करणार आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडार्स आणि मुंबई इंडियन्स सामना आहे. हा सामना जिंकून सहकार्याचा सचिनला शुभेच्छा देण्याचा प्रयत्न असणार आहे. तो टीमच्या सहका-या सोबत वाढदिवस साजरा करणार आहे.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या शतकांच्या शतकाप्रमाणे भविष्यात बहुधा कोणीच कामगिरी करू शकणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. माजी कोच आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांनी त्याला अभूतपूर्व क्षमतावान खेळाडू असल्याचे म्हटले. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये सलग २४ वर्षे सक्रिय राहिल्यानंतरही त्याच्या क्षमतेत कसलीच कमी आली नाही.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला, ‘मी जवळपास सर्वच विरोधी खेळाडूंवर रागात अपशब्द वापरले. मात्र, माझी ही रणनीती सचिनवर कधीच यशस्वी ठरली नाही. खेळताना कोणी त्याला डिवचले तर उलट तो आत्मविश्वासाने भरायचा, असे मला वाटते.’

Leave a Comment