
महजबीन बानो उर्प मीना कुमारी हिचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत
झाला. तर मृत्यू 31 मार्च 1972 रोजी वयाच्या फक्त 40 व्या वर्षी झाला. ‘द
टेजडी क्वीन’ हे बिरुद लाभलेल्या मीना कुमारीने 1939 ते 1972 या 33
वर्षाच्या कारकिर्दीत 93 चित्रपटात अभिनय केला असला तरी ‘साहिब बिबी और
गुलाम’मधील तिची ‘छोटी बहू’ही भूमिका अक्षरश: ती जगली आहे. मीना कुमारी
यांना आपल्या कारकिर्दीत ‘परिणीता’1953,‘बैजू बावारा’ 1954,‘साहिब बिबी
और गुलाम’ 1963,‘काजल’ 1964, या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार
मिळाले. तर अशा रुपसंपन्न व अभिनयसम्राज्ञी अभिनेत्रीच्या जीवनावर ‘स्काय
व्होक्स थिएटर ग्रुप’एक हिंदी नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे ते म्हणजे ‘एक
तनहा चॉंद’.