मुंबई दि. २४- आपल्या जादुभरी आवाजाने अनेक रसिकांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ गायिका शमशाद बेगम यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी काल रात्री निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते असे त्यांची कन्या उषा यांनी सांगितले. कांही मोजक्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत शमशाद बेगम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेरे पिया गये रंगून, कभी आर कभी पार लागा तिरे नजर, कजरा मुहोब्बतवाला अशी एकापेक्षा एक अजरामर गाणी देणार्याभ शमशाद बेगम यांचा जन्म १४ एप्रिल १९१९ ला पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. १६ डिसेंबर १९४७ साली त्यांनी प्रथम पेशावर रेडिओवर आपले पहिले गाणे गायिले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत प्ले बॅक देणार्या पहिल्या काही कलाकारांत त्यांचा समावेश होता.
पती गणपत लाल बट्टो यांचे १९५५ साली निधन झाल्यानंतर शमशाद बेगम आपली मुलगी उषा हिच्यासमवेत मुंबईतच रहात होत्या.