नवी दिल्ली दि.२४- राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या बलात्काराच्या घटनांचे तांडव दिवसेनदिवस वाढत चालले असताना आता सर्वसामान्य माणसांना आपले संरक्षण आपणच करायला हवे याची खात्री पटली आहे. त्यातूनच एनआयएफटीच्या दोन तरूणांनी महिलांना बलात्कार्यांना चांगला धडा शिकविता येईल आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी थोडा वेळही मिळू शकेल असे जाकीट तयार केले आहे. निशात प्रिया आणि शाहजद अहमद यांनी तयार केलेल्या या जाकीटात इलेक्ट्रिक सेन्सरचा वापर करण्यात आला आहे.
यामुळे महिलांना अथवा मुलींना कुणीही त्यांची छेड काढतेय किवा अंगचटी येतेय असे जाणविल्यास त्यांनी या जाकीटाच्या मनगटाच्या ठिकाणी असणारे बटन दाबले की हल्ला करू पाहणार्याय व्यकतीला ११० व्होल्टचा शॉक बसणार आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ताप्तुरते अंपगत्व येऊ शकणार आहे. दरम्यान संबंधित महिलेला सुटका करून घेण्यास पुरेसा अवधीही मिळणार आहे.
दोन प्रकारात हे जॅकेट बनविले गेले असून एक डेनिम प्रकारात आहे तर दुसरे अॅक्रेलिक प्रकारात आहे. विशेष म्हणजे हे जॅकेट बाहेरून नेहमीच्या जॅकेट प्रमाणेच दिसते. मात्र त्यावर धातूमध्ये जे डिझाईन करण्यात आले आहे, त्याचा उपयोग समोरच्या हल्ला करणार्या व्यकतीला शॉक देण्यासाठी होतो असे या दोघांचे म्हणणे आहे
यापूर्वी मनीषा मोहन आणि तिची मैत्रिण या दोघी अभियंता मुलींनीही अशाच प्रकारे अँटी रेप अंडरवेअर तयार केली आहे. यातही इलेक्ट्रिक सेन्सरचा वापर करण्यात आला असून त्याचे बटण अंडरवेअरच्या इलॅस्टीकजवळ बसविण्यात आले आहे. यात जीपीएस सिस्टीमही बसविली गेली आहे त्यामुळे अशी घटना घडत असेल तर संबंधत व्यक्ती कुठल्या स्थळी आहे याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळू शकणार आहे आणि बटन दाबले असता अतिप्रसंग करू पाहणार्या व्यक्तीला येथेही जोराचा शॉक बसतो.