आगामी काळात येत असलेल्या सिनेमात अभिनेता अनिल कपूर आणि सोनम कपूर ही वडील आणि कन्येची जोडी एकत्रित झळकणार आहे. दोघेजन एकत्रित पाहण्यास मिळतील अशी त्याच्या चाहत्याची अपेक्षा होती. त्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असून आगमी काळात येत असलेल्या ‘बांबे टॉकीज’ या सिनेमातून अनिल आणी सोनम कपूर एकत्रित दिसणार आहेत.
बॉलीवुडमधील ही वडील आणि कन्येची जोडी सोनम व अनिल कपूर ‘बांबे टॉकीज’ मधील एका गाण्यातून पहिल्यांदा एकत्रित झळकणार आहेत. भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने चार लघु सिनेमाची निर्मिती केली जात आहे. ‘बांबे टॉकीज’ची निर्मिती फिल्मकार दिबाकर बनर्जी, जोया अख्तर, अनुराग कश्यप आणि करण जौहर मिळून करीत आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार फिल्मकराने एक विशेष गाणे समावेश केला आहे. सोनम आणि अनिल कपूर यांच्या सोबतच या गाण्यात बॉलीवुडमधील अनेक स्टार मंडळी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या गाण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.