
म्हणून अमेरिका ही अमेरिका आहे आणि भारत देश हा भारत देश आहे. या दोन देशातला फरक तर नेहमीच जाणवत असतो. काही प्रसंगांनी तर तो ठळकपणे जाणवतो.

म्हणून अमेरिका ही अमेरिका आहे आणि भारत देश हा भारत देश आहे. या दोन देशातला फरक तर नेहमीच जाणवत असतो. काही प्रसंगांनी तर तो ठळकपणे जाणवतो.
अमेरिकेतल्या बोस्टन शहरात स्फोट झाले. त्याच्या आधी भारतात बंगलोर मध्येही स्फोट झाले होते. या दोन स्फोटात फरक आहे. बोस्टनच्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एका तासातच स्थितीची माहिती घेतली आणि राष्ट्राला उद्देशून भाषण केले. या स्फोटात तीन लोक मारले गेले. तसा हा स्फोट किरकोळच. पण ओबामा यांनी आपल्या भाषणात म्हटले, तीन ही मृतांची सं‘या कमी असली तरीही शेवटी हा हल्ला अमेरिकेच्या प्रतिष्ठेवरचा आहे असे आम्ही समजतो. त्याचा तपास लावला जाईल आणि हा गुन्हा करणारांना आम्ही कडक शासन घडवू. या घटनेनंतर भारताच्या पंतप‘धानांनीही अमेरिकेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि तीन अमेरिकी नागरिक हकनाक बळी पडले याबद्दल दु:ख व्यक्त केले.
बंगलोरमध्येही स्फोट झाले पण आपल्या पंतप्रधानांना बंगलोरमध्ये जखमी झालेल्यांच्या दु:खात सहभागी झालेल्यांना शोकसंदेश पाठवायला पूर्ण 24 तास लागले. त्यांनी अमेरिकेतल्या स्फोटाविषयीची प्रतिकि‘या मात्र तासाभरातच पाठवली. काय म्हणावे या दुर्दैवाला ? अमेरिकेत स्फोट झाला तो तसा किरकोळ होता पण अमेरिकेचे अध्यक्ष तो फार गंभीर असल्याचे आवर्जुन सांगत होते. उलट बंगलोरमध्ये झालेले स्फोट गंभीर स्वरूपाचे होते. पण आपल्या गृहखात्याने ते फार कमी तीव‘तेचे आहेत असे म्हटले आणि आपल्या माध्यमांनीही तसेच सांगून स्फोटाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयास सुरू केला. असे का होते ? यामागे बरेच राजकारण असते. त्याला आपली माध्यमेही बळी पडतात. स्फोटाची तीव‘ता ही काय मृतांच्या आकड्यांवरूनच मोजायची असते का ? कोणीच मेले नाही म्हणजे स्फोट तीव‘ ठरतो आणि केवळ काही लोक जखमी झाले म्हणून तो सौम्य ठरतो की काय ? खरे तर स्फोट किती का तीव‘तेचा असेना पण तो करण्यासाठी अतिरेक्यांनी आपल्या समाजात काही लोकांचे ब‘ेन वॉशिंग करून त्यांना आपल्या कटात सहभागी करून घेतलेले असते. आपली सुरक्षा व्यवस्था भेदून शस्त्रे वा स्फोटके जमा केलेली असतात. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून बाँब तयार केलेला असतो. कोणालाही न कळता स्फोट घडवलेले असतात आणि कोणालाही न घाबरता स्फोटाची जबाबदारीही जाहीरपणे घेतलेली असते.
प्रत्यक्षात स्फोटात किती मनुष्यहानी झाली याला काही महत्त्व देण्याचे कारण नाही. या लोकांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेला एवढे आव्हान दिले हा प्रकार गंभीरच असतो. पण बंगलूरच्या स्फोटानंतर आपले नेते हा स्फोट सौम्य असल्याचे दाखवत होते. बोस्टन आणि बंगळूरमधला हा फरक आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. स्फोट झाल्यानंतर बोस्टन शहर ठप्प झाले. पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेतले आणि तिथल्या कॅमेर्यातल्या चित्रिकरणाच्या साहयाने तीन दिवसांत आरोपींना अटकही केली. त्यांनी अत्यंत तडफेने कायवाई केली. कोठेही भोंगळपणा नाही. वेंधळेपणा नाही. घटनास्थळाला कोणाही राजकीय नेत्याने भेट दिली नाही. आपल्याकडे मात्र अशी घटना घडली की पोलिसांपेक्षा नेतेच तातडीने धावतात. तिथे ते एवढी गर्दी करतात की, पोलिसांना तपासाच्या कामात अडथळे येतात. नेत्यांचे फोटे काढले जातात. त्यांना मतांची प्राप्ती व्हावी अशा पद्धतीने सारी रचना केलेली असते. फोटोग‘ाफरही त्यांच्या पेक्षा अधिक गर्दी करतात. सारा मामला वेधळेपणाचा. हा देशावरचा हल्ला आहे असे कोणाला वाटतच नाही. हल्ला कसा का असेना पण त्याचा फायदा घेऊन आपण आपले राजकीय बस्तान बसवले पाहिजे असा स्वार्थी विचार नेते मंडळी करीत असतात. अमेरिकेत असा प्रकार अभावानेेही घडत नाही.
अमेरिकेला दहशतवादी कारवायांचा अनुभव नाही. त्यांच्या देशात अशी कारवाई एकदाच 2001 साली घडली होती. नंतर असा प्रकार कधी घडला नाही पण त्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने तपास केला आणि अशा स्फोटाची तपासणी कशी करायची असते हे दाखवून दिले. तीन दिवसांत आरोपीला अटकही केले. आपल्याकडे काय झाले ? दहशतवादी कारवाई हा आपल्याकडे होणारा नित्याचा प्रकार झाला आहे पण आपण त्यातून काहीही शिकायचे नाही असा निर्णयच घेतला आहे. आपल्याला बंगलोरचे आरोपी सापडत नाहीत. याच बंगलोर शहरात 2005 सालपासून पाच वेळा असा हल्ला झाला आहे. पण आपल्या पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. अमेरिकेत एका छोट्या स्फोटाला राष्ट्रीय आपत्ती मानले जाते पण, आपल्या देशात संसदेवर हल्ला होतो, मुंबई सार‘या दोन कोटीच्या शहराला दहा दहशतवादी 72 तास वेठीस धरतात त्यांनाही आपण राष्ट्रीय आपत्ती न मानता, ऐसे छोटे मोटे हादसे होतेही है असे म्हणतो. हा दृष्टीकोनातला फरक आहे म्हणूनच अमेरिका यानंतर हल्ला होणार नाही याची खात्री देऊ शकते. आपल्या सरकारला तशी खात्री देता येत नाही. दोन देशातली साधन संपत्ती कमी जास्त असू शकते. पोलिसांची ताकद कमी जास्त असू शकते पण स्फोटानंतरची सरकारची इच्छा शक्ती आणि एकात्मतेची भावना यातही अंतर असते.