पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली- महागाईने होरपळलेल्या नागरिकाला पेट्रोल कंपन्याने पुन्हा एकदा सुखद धक्का देणार आहेत. एप्रिलअखेरीस पेट्रोलच्या किंमतीत प्रति लीटर अडीच रुपयांनी कपात करण्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा लाभणार आहे. नव्या आर्थिक वर्षात पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर ८५ पैशांनी व परत एकदा एक रुपयाने स्वस्त झाले होते.

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती चांगल्याच उतरल्यात. सध्या बाजारात तेलाचे दर प्रती बॅरल ९९ डॉलर एवढे झाले आहेत. दर पंधरवड्याला या दरांचा आढावा घेऊनच तेल कंपन्या पेट्रोलच्या किंमती ठरवत असतात. त्यामुळे पेट्रोलच्या दरात यावेळी साधारण अडीच रुपयांची कपात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

तसे पहिले तर १ एप्रिलला पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर ८५ पैशांनी कपात झाली होती, तर १५ एप्रिलला पेट्रोल एक रुपयानं स्वस्त झालं होतं. त्याआधी १६ मार्चलाही पेट्रोलचे दर २.४० रुपयांनी कमी झाले होते. आता पुन्हा एकदा तशीच खुशखबर जनतेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment