चीन्यांचे भारतीय बाजारात असेही आक्रमण

चीनमधून निर्यात केले जाणारे आणि भारताच्या बाजारात भरून वाहणारे स्वस्तातले बल्ब, फोन, कुलुपे, बॅटर्या , कात्र्या, छत्र्या, मोबाईल, आकाशकंदिल, सजावटीचे सामान, खेळणी यांनी भारतीय ग्राहकांना प्रचंड मोहिनी घातली आहेच. त्यात आता भर पडते आहे ती चीनमधून डॉक्टरीची पदवी घेऊन येणार्या  भारतीय विद्यार्थ्यांची. भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्याे चीनमधील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २००८ मधील २४ वरून तब्बल ५० वर पोहोचली आहे आणि प्रत्येक महाविद्यालयात किमान १५० भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे हा त्याचा ढळढळीत पुरावा म्हणावा लागेल.

चीनमध्ये जाऊन वैद्यकीय पदवी मिळविणे भारतीय विद्यार्थ्यांना सहज परवडणारे असून वैद्यकीय पदवीची साडेचार वर्षे शिवाय १ वर्षांची इंटर्नशीप आणि तेथील राहणीखर्च धरून ही पदवी अवघ्या तेवीस लाखात मिळते असे समजते. प्रभावी माकर्ेटिग, स्वस्त शिक्षण आणि युरोपच्या तुलेनेने स्वस्त राहणीमान यामुळे कांही वर्षांपूवी रशियातून वैद्यकीय पदवी मिळविण्याचा भारतात जो ट्रेंड आला होता तो आता ओसरला आहे. रशिया ऐवजी विद्यार्थी आता चीनला प्राधान्य देत आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजीतूनच शिक्षणाची सुविधाही उपलब्ध असून रूग्णांशी संवाद साधण्यापुरते चीनी भाषेचे ज्ञान येथील महाविद्यालयातून दिले जाते.

भारतीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये चीनी महाविद्यालयात जाऊ इच्छीणार्या  विद्यार्थ्यांची संख्या वाढती आहे. अर्थात तेथून शिक्षण घेऊन आल्यानंतर भारतात प्रॅक्टीस करण्यासाठी येथील एक परिक्षाही द्यावी लागते. चीनी वैद्यकीय महाविद्यालयातून या परिक्षेची तयारीही करून घेतली जाते असे समजते. चीनमधील निनजिन मेडिकल विद्यापीठ हे त्याचा आदर्श नमुना असून एमसीआयच्या स्क्रीनिग टेस्टमधून येथील निवडल्या जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण ७२ टक्के इतके आहे. या विद्यालयाचे डीन जी फेंगलीन व अध्यक्ष यो झी सध्या भारताच्या दौर्‍यावर आले आहेत असेही समजते.

Leave a Comment