शर्लिन चोप्रा करणार लवकरच लग्न

कामासूत्र गर्ल शर्लिन चोप्रा आता लवकरच लग्न करणार आहे. हे ऐकून सर्वांनाच पहिल्यांदा आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. कारण की लग्नाच्या बाबतीत आता ती खूपच सिरयस आहे. तिनेच आता लग्न ठरले असल्याचे सांगून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शर्लिनने तिच्या कुटुंबाच्या पसंदीने वर निवडला आहे.

तिच्या पतीबाबत माहिती देताना शर्लिन म्हणाली, ‘ मी आताच पूर्ण माहिती देणार नाही. मी ज्या मुलासोबत लग्न करणार आहे तो खुपच चांगला मुलगा आहे. त्याचा सिनेमा आणि मॉडलिंगच्या दुनियाशी काहीच संबध नाही. मात्र त्याची आणि माझी ओळख चांगली ओळख आहे. माझे घरातील सर्व मंडळी देखील त्याला ओळखतात. त्यामुळे मी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

काही दिवसापूर्वीच शर्लिन चोप्राने ट्विटरवर मी जीवनात एकटीच असल्याची चर्चा आहे. मात्र आता तिने तिने लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे समजते. सध्या शर्लिन रूपेश प़ालच्या कामासूत्र थ्रीडीमध्ये लीड रोल करीत आहे. हा सिनेमा हिंदी आणि इग्रजीमध्ये तयार केला जात असून यामध्ये शर्लिनच्या न्यूड सीन आहेत. आगामी काळात शर्लिन एक आयटम सॉंग करीत आहे.

Leave a Comment