सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच
अभिनयाबरोबरच समाजसेवेचीही ओढ असलेल्या मकरंद अनासपुरेने
दुष्काळग्रस्तांना अडीच लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायता
निधीमध्ये त्याने हि रक्कम जमा केली आहे. लोकांनी दुष्काळग्रस्तांना मदत
करावी, असं आवाहनही मकरंदने केलं आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे याने
आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता मराठी इंडस्ट्रीमधील
इतर कलाकार मकरंदच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहणं गरजेचं
आहे.