दिल्लीत एकटे चालण्याची भीती-सायना नेहवाल

नवी दिल्ली- सर्वच स्तरातून दिल्लीत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असतानाच निषेधासाठी खेळाडू देखील पुढे आले आहेत. देशाच्या राजधानीत घडणा-या बलात्काराच्या घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहेत. इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना नेहवाल सध्या दिल्लीत आहे.

यासर्व प्रकाराबाबत बोलताना भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल म्हणते, ‘जेंव्हापण मी दिल्लीतल्या बलात्काराच्या घटनेबाबत ऐकते अथवा वाचते त्यावेळी माझे मन सुन्न होते. गेल्यावेळी मी दिल्लीत आले होते, तेव्हाही येथे बलात्काराची घटना घडली होती आणि यावेळीही तसाच प्रकार घडला आहे, त्यामुळेचा मलासुद्धा आता येथे एकटे फिरायची भीतीच वाटू लागली आहे. मी एकटीच दिल्लीच्या रस्त्यावर बाहेर पडण्याआधी दोन वेळा विचार करेन. कारण, असा प्रकार माझ्या बाबतीतही होऊ शकते.’

दिल्ली येथे खेळल्या जाणा-या इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सायना नेहवाल सध्या येथे आली आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अमानूष बलात्कार आणि त्यावरून उसळलेला जनक्षोभ, हे सारे तिच्या अवतीभवतीच घडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सायनाला देशाच्या राजधानीतील हे चित्र अस्वस्थ करत आहे.

Leave a Comment