टीका केल्यास शाब्दिक प्रतिहल्ला चढवा – सोनियांचा आदेश

नवी दिल्ली, दि.२३ – काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर विरोधक विविध मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवत आहेत. या पार्व्शाभूमीवर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. टीका सहन करू नका; शाब्दिक प्रतिहल्ला चढवा, असा आदेशच त्यांनी काँग्रेसजनांना दिला आहे.

एनएसयूआयच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सोनिया बोलत होत्या. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नकारात्मक प्रचाराची संधी कशासाठी द्यायची? देशात परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही किंवा तुमच्या पक्षाने काय केले हे आपण प्रतिस्पर्ध्यांना विचारायला हवे. निश्चिमतच ते विश्वाेसार्ह उत्तर देऊ शकणार नाहीत, असे त्या यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या.

जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी काँग्रेसनेच समर्पित वृत्तीने खडतर कार्य केले आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य  मिळाल्यापासून झालेले चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटली तरी तरुण देशातील स्थितीबाबत तक्रार करत असल्याचे ऐकून यातना होतात. देशात झालेले मोठे परिवर्तन जनतेपर्यंत आपण नेमकेपणाने पोहचवू शकलो नसल्याचेच प्रतिबिंब त्यातून उमटते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते.

Leave a Comment