नवी दिल्ली दि.२२ – स्मार्टफोन हा आता स्टेटस सिंबॉल राहिला नसून सर्वसामान्याची गरजेची वस्तू बनला आहे. स्मार्टफोनची बाजारपेठ कोटींची उड्डाणे करत असताना आता या बाजारात आणखी एक ग्राहक वर्ग समाविष्ट होणार असून हा ग्राहक आहे जगातील अंध व्यक्ती.

स्मार्टफोनवर येणारे ईमेल, मेसेजेस अंध व्यक्ती वाचू शकत नसत मात्र आता ही अडचणही दूर झाली आहे. सुनील डागर या भारतीय संशोधकाने सतत तीन वर्षांच्या संशोधनानंतर अंध व्यक्ती ही वापरू शकतील असा स्क्रीन तयार करण्यात यश मिळविले आहे. हा टच स्क्रीनच आहे मात्र त्यातील तंत्रज्ञानामुळे मेसेज अथवा मेलची अक्षरे आपोआप ब्रेल लिपीत रूपांतरीत होऊ शकतात. आयआयटी दिल्ली च्या सहयोगाने या स्क्रीनच्या चाचण्या सुरू आहेत असे समजते.
सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्क्रीनसाठी शेप मेमरी अॅलॉय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यात बसविलेल्या पीन ग्रीडमुळे जे अक्षर असेल तेथील पीन स्क्रीनवर गरजेनुसार खालीवर होऊ शकते. हा ब्रेल डिस्प्ले असल्याने अंध व्यक्ती अक्षरांच्या उंचवट्यांवरून अक्षरे वाचू शकतात. बाकी सर्व सुविधा सर्वसामान्य स्मार्टफोन प्रमाणेच आहेत.