मध्य प्रदेश, अलिगढमधील बलात्का-यांना फाशी द्या

लखनऊ-दिल्लीत पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर अलिगढ आणि मध्य प्रदेशातही अशाच चिमुकल्या वासनेच्या बळी ठरल्या आहेत. मध्य प्रदेशातील लहानगी नागपुरात मृत्यूशी झुंज देत आहेत, तर अलिगढमध्ये आरोपीने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बलात्का-यांना फाशी देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.

दरम्यान, दिल्लीत पाच वर्षांच्या बालिकेवर पाशवी अत्याचार केल्याप्रकरणी बिहारमधून अटक करण्यात आलेल्या आरोपी मनोज कुमार याला रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. कोर्टाने त्याला चार मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीत पाशवी अत्याचारांना बळी पडलेली पाच वर्षांची बालिका उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे, असे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील घनसौर (जि. सिवनी) येथे चार वर्षांच्या चिमुकलीच्या नराधमाकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकारानंतर बेशुद्धावस्थेत असेल्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठाच थांबला आहे. शनिवारी रात्री विशेष एअरबसने नागपुरातील केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही त्या मुलीची तब्येत चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment