रायगढ, (छत्तीसगढ), दि. २२ – राज्यातील रायगढ जिल्यातील कार्निपाल गावात नक्षलवाद्यांनी आज पंचायत सचिवाची हत्या केली. लाखपती दानसेना असे या सचिवाचे नाव आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबर्या असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रायगढच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
नक्षलवाद्यांकडून पंचायत सचिवाची हत्या
गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार डझनभर नक्षलवाद्यांनी दानसेना यांचे काल त्यांच्या घरातून अपहरण केले. त्यानंतर गावातीलच चौकात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांचा खबर्या असल्याच्या संशयावरून आपण हे कृत्य केल्याचे नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.