पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) -सुरेशकलमाडी यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केलेली नाही असे लोकलेखा समितीचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीष बापट यांनी सांगितले.
कलमाडींवरील कारवाई राजकीय हेतूने नाही- गिरीश बापट
विधानसभा अधिवेशनाच्या कालावधीत पुण्यातील विविध समस्यांवर घेतलेली भूमिका बापट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. ते म्हणाले, लोकलेखा समितीने दोन अहवाल सादर केले होते. लोकलेखा समितीमध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. त्यांच्या ठरावानुसारच ही कारवाई करण्यात आली. कॅगच्या अहवालात काही हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. स्पर्धा संपुष्टात येत असताना आकस्मित निधीतून 32 कोटी रुपये बँकेतून काढण्यात आले होते. त्याचा कोणताही हिशेब आणि विवरणही देण्यात आले नव्हते. लोकलेखा समितीने बालेवाडी संकुलाची पाहणी केली त्यावेळीही काही धक्कादायक बाबी पुढे आल्या होत्या. महापालिकेचा कर चुकविण्यात आला होता. याशिवाय 54 हजार चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचेही समितीच्या निदर्शनास आले होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एलबीटी, रुपी बँक गैरव्यवहार, द्रुतगती महामार्ग, पाणीप्रश्नी सरकारचे अधिवेशनाच्या कालावधीत लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.
—————————————————