’डान्सिंग सुपरस्टार’चा फ्लॅश मॉब

डान्सिंग सुपरस्टार’ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो स्टार प्लस वाहिनीवर लवकरच
येतोय. या शोच्या शेवटच्या ट्रायलच्या दिवशी परिक्षकांना एक मोठ
सरप्राईझ मिळालं. या शोचे सगळे क्रु मेम्बर्सनी स्टेजवर येऊन फ्लॅश मॉब
केला आणि सर्वांनी या शोच्या टायटल साँगवर ताल धरला. एवढच नाही तर
परीक्षक रितेश देशमुख ,अँश्ले लोबो आणि गीता कपूरही या सेलीब्रेशनमध्ये
सहभागी झाले. परिक्षक डान्सिंग सुपरस्टार’ या शोच्या लाँन्चची आतुरतेने
वाट बघतायत. हा शो 27 एप्रिलपासून रात्री 9 वाजता स्टार प्लस वाहिनीवर
सुरु होईल.