सुपरफास्ट टायपिंगसाठी नवा की बोर्ड

टचस्क्रीनवर सुपरफास्ट स्पीडने टायपिंग करता यावे यासाठी संशोधकांनी नवा की बोर्ड तयार केला आहे. या की बोर्डमुळे नेहमी अंगठ्याने केल्या जात असलेल्या टायपिंगपेक्षा ३४ टक्के अधिक वेगाने टायपिंग केले जाते असा संशोधकांचा दावा आहे. हा की बोर्ड प्रामुख्याने टच स्क्रीन असलेले मोबाईल, टॅब्लेट यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे.

संशोधकांच्या मते सध्या टायपिंग साठी असलेला क्वार्टी ले आऊटचा की बोर्ड अंगठ्याने टायपिंग करण्यासाठी फारसा अनुकुल नाही. टायपिंगची चांगली सवय असलेला युजरही मिनिटाला जास्तीत जास्त २० शब्दच टाईप करू शकतो. वास्तविक फिजिकल की बोर्डवर यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने टायपिंग केले जाते.

मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, सेंट अॅन्डूज विद्यापीठातील संशोधकांनी जो नवीन की बोर्ड तयार केला आहे त्यासाठी कॉम्प्युटेशनल ऑल्टीमिझेशन प्रोसेस या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे दोन्ही अंगठ्यांनी युजर कमी श्रमात टायपिंग करू शकतो. त्यात नेहमी वापरात येणारी अक्षरे की बोर्डच्या मध्यावर घेतली गेली आहेत त्यामुळे अंगठे हलविण्यात जाणारा वेळ कमी होतो असाही त्यांचा दावा आहे.

Leave a Comment