रणबीर, कैटरीना होणार राम-सीता

आगामी काळात अभिनेता अरशद वारसी ‘रामायण’ या महाकाव्यावर आधारित सिनेमा तयार करीत आहे. या सिनेमासाठी तो सध्या अभिनेत्याची निवड करण्याच्या कामात व्यस्त आहे. राम-सीताच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील रणबीर कपूर आणि कैटरीना कैफ ही जोडी फिट असेल असे त्याला वाटते.

थ्रीडी एनीमेशन ‘द क्रुड्स’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगप्रसंगी उपस्थित असलेला अभिनेता वारसी म्हणाला, ‘ मी सर्वच अभिनेत्याची तुलना करून पहिली आहे. रामची भूमिका रणबीर कपूर करण्यास योग्य आहे. त्यासोबतच सर्वच बॉलीवूडमधील अभिनेत्रिची सिताच्या भूमिकेशी तुलना केली असता कैटरीना कैफ हा रोल प्रभावशालीपणे करू शकेल असे वाटते. तिच्या शिवाय सिताची भूमिका दीपिका पादुकोण सुद्धा करेल असे वाटते.’

सध्या अभिनेता वारसी पौराणिक कथावर आधारित सिनेमा तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. सध्या कंप्यूटर ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘रामायण’चा आनंद घेता येणार आहे. गेल्या काही दिवसापासून कंप्यूटर ग्राफिक्सच्या माध्यमातून पौराणिक सिनेमा करणे आता पूर्वीच्या तुलनेत सहज शक्य झाले असल्याचे अर्शद वारसीने स्पष्ट केले.

Leave a Comment