फोर्ड इंडियासाठी भारत निर्यात केंद्रही

चेन्नई दि.२० – फोर्ड इंडिया या वाहन उत्पादक कंपनीने भारताला निर्यात केंद्र बनविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात उत्पादित होणार्याद कंपनीच्या गाड्यांपैकी २५ टक्के गाड्या निर्यात केल्या जातील अशी अपेक्षा कंपनीचे अध्यक्ष जोगिदर सिंग यांनी सांगितले.

सिंग म्हणाले की चेन्नई येथील कंपनीचे दोन प्रकल्प आणि पुढील वर्षात कार्यान्वित होत असलेल्या अहमदाबाद येथील प्रकल्पात पुढील वर्षापासून वर्षाला ४ लाख ४० हजार गाड्या बनणार आहेत. तसेच कंपनीची इंजिन उत्पादन क्षमताही वर्षाला ६ लाख १० हजारांवर जात आहे. कंपनी केवळ भारतीयांचीच मागणी पूर्ण करणार असे नाही तर येथूनच निर्यातीचाही विचार करत आहे. त्यात उत्पादनाच्या २५ टक्के वाहने तर ४० टक्के इंजिन निर्यातींचे ध्येय ठरविण्यात आले आहे.

कंपनी येत्या कांही महिन्यात त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही – इको स्पोर्ट -बाजारात आणत आहे. ही गाडी निर्यातीत चांगली आघाडी घेईल असा विश्वास कंपनी अधिकार्‍यांना वाटतो आहे. चेन्नईतील प्रकल्पात १४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक नव्याने करण्यात आली असून सध्या कंपनी आशियाई बाजारात निर्यात करत आहे. मात्र इको स्पोर्ट बाजारात आली की अन्य देशांच्या बाजारपेठांचाही विचार केला जाणार आहे.

Leave a Comment