चेन्नई सुपर किंग्जकडून दिल्लीचा पराभव

नवी दिल्ली- आयपीएलच्या सहाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 86 धावांनी विजय मिळवला. दिल्ली संघाचा स्पर्धेतील हा सलग सहावा पराभव आहे. त्याआधी माइक हसीच्या नाबाद 65 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सपुढे 170 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दिल्लीचा डाव 83 धावांतच संपुष्ठात आला.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेकजिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या चेन्नईकडून हसीने 50चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने 23 चेंडूत 44 धावा केल्या. तर सुरेश रैनाने 30 धावांची खेळी केली.

स्पर्धेत सलग पाच पराभव स्विकारावा लागलेल्या दिल्लीला याही सामन्यात चांगली कामगीरी करता आली नाही. दिल्लीच्या केदार जाधवने 31 धावा केल्या. अन्य सर्व फलंदाज मात्र केवळ हजेरी लावून गेले. वीरेंदर सेहवाग पुन्हा एकदा अपयशी ठरला. ते केवळ 17 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून मोहित शर्माने तीन गडी बाद केले.

या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात चौथ्या स्थानवर झेप घेतली आहे. दिल्ली मात्र अद्याप शेवटच्या स्थानावर कायम आहे.

Leave a Comment