आयपीएलमध्ये अमित मिश्राचा अनोखा विक्रम

पुणे- आयपीएल स्पर्धेत खेळत असताना अमित मिश्राने अनोखा विक्रम करताना सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा हॅट्ट्रिक केली आहे. बुधवारी पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात अमितने एकाच षटकाच्या पाच चेंडूंत चार गडी बाद केले. त्यासोबतच त्याने यापूर्वी २००८ आणि २ ० १ १ मध्ये हॅट्ट्रिक केली होती. आयपीएलमध्ये तीन वेळा हॅट्ट्रिक करणारा अमित पहिला क्रिकेटपटू आहे.

अमित मिश्राच्या कारकीर्दीतील तिस-या हॅट्ट्रिकच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने पुणे वॉरियर्सला १ १ धावांनी नमवले. या कमी धावसंख्येच्या या सामन्यात एक वेळ पुणे वॉरियर्स ५ बाद १०१ धावा अशा स्थितीत होती. पुण्याचा विजय दृष्टिपथात होता. मात्र, कर्णधार अँग्लो मॅथ्यूज, अभिषेक नायर, भुवनेश्वरकुमार, अशोक डिंडा आणि राहुल शर्मा यांनी निराशा केली. अमित मिश्राने आपल्या गुगली चेंडूच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवून पुण्याच्या आशेवर पाणी फेरले. कर्णधार मॅथ्यूजने टिकून खेळण्याऐवजी षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि २० धावा काढून बाद झाला.

गोलंदाजी सोबतचा फलंदाजीत सातत्य राखताना अमित मिश्राने चमकदार कामगिरी केली. हैदराबादचा स्कोअर सात गडी बाद ७५ असा होता. टीम संकटात असताना अमित मिश्रा (३०) आणि आशिष रेड्डी (नाबाद १९ ) यांनी आठव्या विकेटसाठी ४० धावा जोडून हैदराबादला शंभराच्या पुढे पोहोचवले. एकंदरीत अमितच्या अष्टपैलू कामगिरीमुळे हैदराबादला विजय मिळवता आला.

Leave a Comment