टेक्सास, दि.१९ – अमेरिकेच्या टेक्सासमध्ये खतांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात ६०जण जखमी झाले असल्याचे समजते. स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली असून स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. टेक्सासच्या वाको परिसरात हा खतांचा कारखाना आहे. या स्फोटात आतापर्यंत 60 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिस अधिकार्यांनी दिली आहे.
अमेरिकेत टेक्सासमध्ये स्फोट, 60 जखमी
कारखान्यात काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यातील स्फोटानंतर आजूबाजुच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अमेरिकेत दोन दिवसांपूर्वी बोस्टन मॅरेथॉनमध्ये झालेल्या स्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला तर 140 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी प्रेशक कुकरचा वापर करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
