संजय दत्तला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा

नवी दिल्ली- मुंबईतील ९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी संजूबाबाला आणखी चार आठवड्यांची मुदत देण्यात आल्याने त्याची तुरुंगवारी महिन्याभराने पुढे गेली आहे.

या प्रकरणी संजय दत्तने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्यावर बुधवारी सुनावणी झाली. नुकतीच बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला पाच वर्षाची सजा झाली होती. आगामी चित्रपटांवर निर्मात्यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी किमान १९६ दिवसांचा कालावधी लागेल. असे असल्याने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संजय दत्तने केली होती.

या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला तात्पुरता दिलासा दिला आहे. चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी संजूबाबाला आणखी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यमुळे तूर्त तरी संजयला दिलासा लाभला आहे.

Leave a Comment