जयाप्रदांना सुरक्षा द्या; अमरसिंहांची गृहमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली, दि.१७ – खासदार अभिनेत्री जयाप्रदा यांना पुरेशी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे. उत्तर प्रदेशात त्यांना त्यांच्या मतदारसंघातच सुरक्षित स्थिती राहिलेली नसून तेथील पोलिसांनीच त्यांना धक्काबुक्की केली असल्याची तक्रार त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

काल अमरसिंहांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. ते म्हणाले की, लोकसभेच्या सदस्या असलेल्या जयाप्रदा आपल्या मतदारसंघात भेटीसाठी गेल्या असता १३ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या सरकारी अधिकार्यांयनी ४० पोलिसांचे पथक घेऊन त्यांच्या निवासस्थानी घुसखोरी करून त्यांच्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकला. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली असा त्यांचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशात खासदारांना त्यांच्या गाडीवर लालदिवा लावण्यास बसपा सरकारच्या काळातच अनुमती देण्यात आली आहे; परंतु आझम खान यांच्या सांगण्यावरून सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी त्यांच्या घरात बेकायदेशीर घुसून हा दिवा काढून टाकतानाच त्यांना शिवीगाळही केली. त्यांच्यासाठी तेथील वातावरण अत्यंत असुरक्षित बनले असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment