नवी दिल्ली दि.१७ – रॉयल एनफिल्ड या प्रसिद्ध बुलेट कंपनीने त्यांची नवी रॉयल एनफिल्ड ५०० सीसीची बुलेट बाजारात आणली असून तिची किंमत १ लाख ५४ हजार रूपये इतकी आहे. या ५०० सीसी बुलेटची ग्राहकांना बराच काळ प्रतीक्षा होती आणि ही बुलेट रॉयल एनफिल्ड कंपनीच्या उत्पादनांना नवीन परिमाण देईल असा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष शाजी कोशी यांनी व्यक्त केला आहे.
ही गाडी सुरवातीला बुलेटसाठीचे उत्तम मार्केट समजल्या जाणार्या पंजाब, हरियाना, चंदिगढ, दिल्ली आणि केरळ येथे सादर केली जात असून टप्पटप्प्याने ती देशभर उपलब्ध केली जाणार आहे. या बुलेट चे डिझाईन करतानाच भारतीय बाजारपेठेबरोबरच बुलेटचे प्रेमी असणार्या ग्राहकांचाही खास विचार केला आहे असेही कोशी म्हणाले.
बुलेट ही सर्वात जुनी गाडी अजूनही उत्पादन होत असलेली एकमेव मोटरसायकल आहे आणि बुलेटचे ग्राहक जगभरात पसरले असून अन्य कोणतीही दुचाकी गाडी ते पसंत करत नाहीत अशी तिची ख्याती आहे. बुलेट ५०० इलेक्ट्रीक स्टार्ट गाडी आहे.