यूएस सिनेटर रॉजर विकर यांना विषारी पत्र

वॉशिंग्टन दि.१७ – अमेरिकेतील बोस्टन येथे काल झालेल्या दोन बॉम्बस्फोटांचा धक्का अजून ओसरतो आहे तोच अमेरिकेतील रिपब्लीकन पक्षाचे मिसिसीपीचे सिनेटर रॉजर विकर यांना विषारी पत्र आले आहे. सुरक्षा व्यवस्थेने याची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

याविषयी रोग नियंत्रक आणि प्रतिबंध विभागातील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकर यांना आलेल्या पत्राला रिसिन या विषाचा थर देण्यात आला आहे. हे विष अतिशय जहाल असून ते एरंडाच्या बियांपासून बनविले जाते. हे पत्र आल्याबरोबर सर्वच सिनेटरांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

२००१ साली याच प्रकारे डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन सिनेटरना अँथ्रक्सचे जंतू असलेली पत्रे पाठविली गेली होती. अँथ्रॅकस हा घोड्यांना होणारा आजार असून त्याचे जंतू मानवी शरीरात गेले तर माणसाचा मृत्यू ओढवतेा. अशी पत्रे आल्यापासून सिनेटरला येणार्‍या सर्व पत्रांचे स्क्रीनिग केले जात आहे. त्यातच विलर यांना आलेल्या विषारी पत्राचा तपास लागला असे सुरक्षा अधिकार्यां नी सांगितले.

Leave a Comment