पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला की, सहसा बॉलिवूडचे ‘बिग बजेट’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेले असतात. मात्र इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) सुरू झाले की, एप्रिल-मे महिन्यांच्या सुट्टीत चित्रपट प्रदर्शित करण्यास बॉलिवूडमधील भले-भले निर्माते आपला चित्रपट मार्केटमध्ये उतरवण्याचे धाडस करत नाहीत. याच गोष्टीचा ’ायदा घेण्यास ‘जिगरबाज’ मराठी निर्माते सज्ज झाले असून येत्या शुक‘वारी बॉ्नस ऑि’सवर मराठी चित्रपटांची ‘सुपर सिक्सर’ लढाई रंगतदार ठरणार आहे.
मराठी चित्रपटांचा ‘सुपर सिक्सर’
चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बॉलिवूडमध्ये किमान सहा महिने आधी नियोजन असते. मराठीमध्ये मात्र अशा प्रकारचे नियोजन करणारे निर्माता, दिग्दर्शक बोटावर मोजण्या इतपतच आहेत. हिंदी चित्रपट नसल्याने आपला चित्रपट प्रदर्शित करावा, असे एखाद्या निर्मात्याला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र एका पाठोपाठ सहा निर्मात्यांनी एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करायचे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, का हे येणारा काळच ठरवेल. शुक‘वारी प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट वेगळ्या जॉनरचा, टार्गेट ऑडियन्स वेगळा असलेला आहे हीच या निर्मात्यांच्या जमेची बाजू.
एकाच दिवशी प्रदर्शित होणार्या या सहा चित्रपटांमध्ये विविध फिल्म फेस्टीवलमध्ये समिक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘टुरींग टॉकीज’ हा पहिला चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचे तर निर्माती आणि नायिका अशा दुहेरी भूमिकेत तृप्ती भोईर आहे.याशिवाय किशोर कदम, सुबोध भावे, सुहास पळशीकर, मिलिंद शिंदे, वैभव मांगले आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका ‘टुरींग टॉकीज’ मध्ये आहेत. तंबूतील चित्रपट व्यवसाय हा ‘टुरींग टॉकीज’चा विषय आहे.
दुसरा चित्रपट आहे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शनात पदार्पण असलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’! रोमॅँटीक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, सुनिल बर्वे, प‘वी जोशी, स्मिता तळवळकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉलिवूडचा स्टार अभिनेता आणि मराठमोळ्या रेणुका शहाणेचा पती आशुतोष राणा याचं ‘येडा’ चित्रपटातून मराठीत आगमन होत आहे. मनाची विकृती, मनोरंजन आणि थरार असा तिहेरी मसाला ‘येडा’मध्ये आहे. अनिकेत विश्वासराव, रिमा लागू यांच्या भूमिका असलेल्या ‘येडा’चे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांचे आहे.
अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर, श्वेता साळवे, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कुरूक्षेत्र’ हा शुक‘वारी प्रदर्शित होणारा चौथा चित्रपट असून याचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांचे; तर संगीतकार आहेत डॉ. सलिल कुलकर्णी. ‘कुरुक्षेत्र’ चे कथानक सध्या राज्यात पडलेल्या दुष्काळाभोवती केंद्रित आहे.
उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेऊन इंडियन मॅजिक आय मोशन प्निचरतर्’े ‘चिंटु – 2 खजिन्याची चित्तरकथा’ हा निव्वळ बालकांसाठीचा चित्रपट प्रदर्शित होतोय. मागील वर्षी ‘चिंटु’ला बच्चेकंपनीचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. खजिन्याची ही चित्तरकथा म्युझिकल असून यामध्ये पाच गाणी आहेत. संदिप खरेंच्या गीतांना डॉ. सलिल कुलकर्णींचे संगीत आहे.
वि‘यात दिग्दर्शक यशवंत भालकर यांचा ‘लेक लाडकी’ हा आई व मुलगी यांच्या नात्यावर आधारीत आहे. यामध्ये प्रतिक्षा लोणकर, प्रियंका यादव, मोहन जोशी, उमेश कामत आणि मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहे.
आता या सर्व धामधुमीच्या मोहिमेत, ऐन रामनवमीच्या मुहूर्तावर हे सहा चित्रपट प्रदर्शित होत असताना, त्यांचे भवितव्य अर्थातच प्रेक्षकांच्या हाती असेल. दरम्यान, या मुहूर्तावर हिंदीमध्ये ’क्त ‘एक थी डायन’ हा इम‘ान हाश्मी-कोंकणा सेन-शर्मा यांचा चित्रपट प्रदर्शित होत असून मराठी सहा विरुद्ध हिंदी एक आणि आयपीएल असा सामना आता रंगणार आहे. पाहूया कोण बाजी मारतोय ते!